फक्त 10 मिनिट लावा,वांग काळे डाग सुरकुत्या दूर,मेकअप शिवाय दुप्पट सुंदर दिसाल..

फक्त एका काकडीचा रस आणि घरातील काही वस्तू त्यात मिक्स करून लावा आणि डोळ्याखालील काळे डाग चेहऱ्यावरील काळपटपणा झटपट घालवा. मित्रांनो उष्णतेपासून आपल्याला आपला चेहरा वाचवायचा असेल त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील सर्व प्रकारचे डाग कमी करायचे असतील तर हा रस चेहऱ्याला अर्धा तास लावा आणि धुऊन टाका.

हा रस इतका प्रभावी आहे की तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज येते. चेहऱ्याला पडलेल्या सुरकुत्या पिंपल्स किती असू द्या पूर्णपणे कमी होतात. जसे खड्ड्याचे पिंपलचे किंवा इतर सर्व उन्हात गेल्यानंतर जे वळ उठतात किंवा काळे डाग पडतात ते देखील पूर्णपणे निघून जातात. त्याचप्रमाणे ब्लॅकहेड्स आणि वाईट हेड्स म्हणजेच काळे व पांढरे कण नाकाच्या बाजूला येतात आणि ते आपल्याला व्यवस्थित वाटत नाही ते देखील पूर्णपणे निघून जातात.

मित्रांनो बरेच लोक महागड्या क्रीम लावतात त्याने थोडा वेळ चेहरा गोरा होतो पण क्रीम वापरायची बंद केली की चेहरा निस्तेज होतो आणि काळा पडतो. त्यावरती सुरकुत्या येतात. असा हा चेहरा सतेज बनवणारा रस असून आपल्याला यात या काकडीच्या रसात काहीतरी अजून घरातील घटक मिस करायचे आहेत. ते कोणते घटक मिक्स करायचे आणि या काकडीचा वापर आपण कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

मित्रांनो बघा असा हा प्रभावी रस आपल्याला बनवण्यासाठी जो पहिला घटक लागणार आहे ते म्हणजे काकडीचा रस. काकडीचा रस आपण आपल्या पद्धतीने कसाही करू शकतात मी किसणीच्या साह्याने घासून त्यातून रस काढत आहे बघा मित्रांनो तुम्ही घरच्या घरी मिक्सरचा वापर करून किंवा तुम्ही तुम्हाला जमल त्या पद्धतीने आपल्याला काकडीचा रस काढायचा आहे.

बघा यासाठी आपल्याला एक काकडी लागणार आहे ती ताजी असावी आणि आपल्याला त्याची साल आहे ते काढून टाकायचं नाही तर सली सह म्हणजे सालीसकट ते आपल्याला वाटून घेऊन त्याचा आपल्याला रस काढायचा आहे. बघा गाळणीच्या साह्याने मी याचा रस काढत आहे हा रस साधारणतः दोन ते तीन चमचे आपल्याला उपलब्ध होईल.

मित्रांनो चेहऱ्याच्या त्वचेसाठी काकडी खूपच लाभदायक आहे. यामध्ये विटामिन के मॅग्नेशियम असते जे त्वचेतील तेल प्रदूषणामुळे चेहऱ्यावर साचलेले धुळीचे कण हे पूर्णपणे काढून टाकण्याचं काम हा रस करतो. त्याचप्रमाणे चेहऱ्यावर जर मृत पेशी साचून राहिले असतील त्या देखील काढून त्याचा काळपटपणा कमी करून त्या ठिकाणी नवीन पेशी तयार होण्यास किंवा येण्यास हा रस पूर्णपणे मदत करतो.

आपण जेव्हा एखाद्या ब्युटी प्रॉडक्टची जाहिरात पाहतो त्याच चेहऱ्यावर काकडीचे गोल गोल काप असतात. असा हा चेहऱ्याला पुरेल एवढ्या प्रमाणात आपल्याला साधारणता दोन ते तीन चमचे रस आपल्याला काढायचा आहे. तसा एक-दोन चमचे रस आपल्याला पुरून जातो. दुसरा घटक टाकायचा आहे ते म्हणजे दूध.

मित्रांनो एक चमचा दूध या मिश्रणात आपल्याला टाकायचे आहे. दूध चेहरा कोमल ठेवतो काळे डाग सुरकुत्या डाग पूर्णपणे कमी करतात. त्वचेला एक प्रकारचा तेज आणण्याचं काम किंवा त्वचेला तेजस्वी बनवण्याचे काम हे दूध करत. बघा आपल्याला एक चमचा दूध आपल्या या मिश्रणात टाकायचा आहे.

जर तुम्हाला बिना तापवता म्हणजे त्याला कच्चे दूध म्हणतात जर ते मिळाले तर ते वापरले तर खूपच छान. आता या मिश्रणात आपल्याला पुढील घटक टाकायचा आहे ते म्हणजे गुलाब जल. मित्रांनो गुलाब जल याला रोज वॉटर म्हणतात. हे काही लोकांना जमत काही लोकांना जमत नाही ज्यांनी जमत नाही त्यांनी वापरू नये. ज्यांना जमत त्यांनी यात हे मिक्स करून वापरायचा आहे.

बघा गुलाब जल साधारणता एक चमचा आपल्याला या मिश्रणाला टाकायचा आहे. गुलाब जल त्वचा उजळण्यासाठी त्वचाला एक प्रकारची चकाकी आणण्यासाठी त्यावरती काळे डाग कमी करण्याचे काम हे गुलाबजल करत. आता हे तिन्ही घटक पूर्णपणे मिक्स करा. मित्रांनो याची वापरण्याची एक पद्धत आहे ती जाणून घ्या हे आपल्याला कधीच संध्याकाळी लावायचं नाही दिवसभरात सकाळ दुपार आणि संध्याकाळच्या अगोदर तुम्ही केव्हाही लावू शकतात त्याला कुठलाही साईड इफेक्ट नाही.