फक्त 1 बटाटा, चेहऱ्यावरील वांग काळे डाग सुरकुत्या 3 दिवसात कमी

मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींचे वय कमी असतं तरीही बरेच व्यक्ती असं सांगतात की तुमचं वय जास्त आहे का म्हणजे आपले वय जास्त वाटते कारण आपल्या चेहऱ्यावर पडलेले सुरकुत्या. बऱ्याच व्यक्तींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात काळे डाग पडतात चेहऱ्यावर तेज राहत नाही अनेक उपाय करूनही पिंपल्स पुळ्या कमी होत नाही. चेहऱ्यावर असलेला वांग कमी होत नाही.

आणि इतर क्रीम किंवा इतर पदार्थ लावले तर तो वांग कमी होण्यापेक्षा नंतर वाढतच राहतो आणि चेहरा काळा पडायला लागतो. यावरती आजचा उपाय अत्यंत फायदा देणारा लाभदायक आहे. या उपायाने चेहरा उजळ चमकदार तेजस्वी होईल. मित्रांनो हा उपाय अत्यंत सोपा असून घरच्या घरी करता येण्यासारखा आहे. या उपायासाठी आपल्याला एक फेशियल तयार करायचा आहे.

एक वेळचा फेस पॅक बनवण्यासाठी आपल्याला पहिली वस्तू लागणार आहे तो म्हणजे बटाटा आणि आपल्याला या बटाट्याचा रस काढायचा आहे. यासाठी एक बटाटा स्वच्छ धुऊन घ्या आणि हा जो बटाटा आहे तो आपल्याला किसणीवर किसून घ्यायचा आहे त्यांनतर गाळणीच्या मदतीने याचा रस काढून घ्या.

मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट ज्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात पुळ्या येतात अशा व्यक्तीने आंघोळ केल्याच्या नंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्यायचा आहे. जर थंड पाण्याने धुऊन घ्यायला जमला नाही तर थंड कापडाने किंवा थंड टावेलने पुसून घ्यावा म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स पुळ्या दोन ते तीन दिवसांमध्ये कमी व्हायला लागेल. ज्या व्यक्तींना वांग आहे चेहऱ्यावरती काळे डाग आहेत अशा व्यक्तीने कच्च्या अक्रोडाचा रस जर आपण चेहऱ्याला लावला तर वांग आणि डाग पूर्णपणे कमी होतात.

बटाट्याचा रस हा साधारणता चार चमचे असायला पाहिजे. आपल्याला या चार चमचे बटाट्याच्या रसामध्ये जो दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे हिरव्या मुगाच्या डाळीचे पीठ होय. मुगाच्या डाळीचे पीठ तुम्ही ही मुगाची डाळ मिक्सरमधून बारीक वाटून याचे पीठ बनवायचे आहे. मुगाच्या डाळीमध्ये झिंक आणि पोटॅशियम असतं जे चेहऱ्यावरील मृतपेशी काढून नवीन त्वचा तयार करते.

त्यातील विटामिन ए आणि विटामिन सी मुळे त्वचा सुरक्षित राहते आता या चार चमचे बटाट्याच्या रसामध्ये पूर्णपणे एक चमचा या डाळीचे पीठ आपल्याला मिक्स करायचे आहे. हे डाळीचे पीठ आहे हे मिक्स करून एक जीव होईपर्यंत चांगलं फेटून घ्यायचे आहे. आणि फेटल्यानंतर आपल्याला साधारणता दहा मिनिट तसेच ठेवून द्यायचे आहे.

म्हणजे ते एकजीव होणार आहे. हा तयार झाला आपला सर्वात सोपा फेशियल पॅक. आपल्याला साधारणतः चेहऱ्याला सर्कुलर मोशन मध्ये लावायचा आहे. पंधरा मिनिटे ठेवून थंड पाण्याने आपल्याला चेहरा धुऊन घ्यायचा आहे. आठवड्यामध्ये तीन दिवस लावू शकता याला कुठलाही साईड इफेक्ट नाही. एखाद्याची त्वचा ऑयली असेल तर त्यांनी या पॅक मध्ये थोडासा मध मिक्स करून लावला तर चांगला परिणाम मिळेल.

एखाद्याची त्वचा कोरडी असेल अशा व्यक्तीने पॅक तयार केला आणि यामध्ये बदाम तेल अर्धा चमचा टाकून मिक्स करून लावलं तर त्याला अजून चांगला परिणाम मिळेल. तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी होतील तुमचा चेहरा ब्राईट तेजस्वी आणि कोमल होईल.