फक्त 1 मिनिटचा हा उपाय करा.. शरिराची उष्णता कमी होऊन शरीर आतून थंड होईल

नमस्कार मंडळी बघा शरीरात उष्णता वाढली तर आपल्याला अनेक रोगांना सामोरे जावे लागत. भरपूर त्रास होतो आणि हा त्रास कमी करण्यासाठी आज मी तुम्हाला उष्णता कमी करण्यासाठी दोन उपाय सांगणार आहे. त्यासाठी व्यायाम आपल्याला करायचा आहे. फक्त एक मिनिटाचा कालावधी हे व्यायाम करण्यासाठी आपल्याला लागतो आणि याचा परिणाम तुम्हाला तात्काळ एक मिनिटात जाणवतो.

यामुळे तुमच्या शरीराचे तापमान साधारणता पाच डिग्री सेल्सिअस ने कमी होण्यास मदत होते असे हे गुणकारी व्यायाम आज मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला व्यायाम आहे तो म्हणजे शितकारी. यासाठी मांडी घालून बसावे आणि तोंडावाटे हळूहळू श्वास घ्यावा आणि नाकावाटे हळूहळू सोडावा हे करत असताना जास्त जोरात श्वास घेऊ नये त्यामुळे तोंड कोरडे पडेल. तर हा श्वास हळूहळू घ्यायचा आहे आणि तोंड बंद करून अगदी हळूहळू नाका वाटे सोडायचा आहे.

हा प्राणायाम आपल्याला सलग एक ते दोन मिनिटे किंवा वीस वेळा करायचा आहे आणि असे केल्याने आपल्या शरीरात नेमकं काय घडतं हे थोडक्यात समजावून घेऊ. याचं काम अगदी घरातील कुलर सारखे आहे. बघा कुलर मध्ये मागे जाळी असते व पुढे फॅन असतो या जाळीवर आपण पाणी सोडतो व समोरील बाजूस असणारा फॅन हवा आत ओढतो तेव्हा जाळीतून हवा आत येते ती थंड होते व फॅन हवा रूममध्ये पसरवतो ती खूप थंड असते.

तसेच आपल्या तोंडातून हवा आत येते थंड होते व ते शरीराला थंड बनवते म्हणून शरीराचे तापमान तात्काळ पाच डिग्री सेल्सियसने कमी होते व शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. यातील दुसरा प्रकार आहे तो म्हणजे शेताली किंवा शीतली. यात आपल्याला जिभेची पुंगणी करायची आहे बारीकशी आणि यातून तोंडात श्वास किंवा हवा आत घ्यायची आहे.

हवा आत घेताना खूप हळूहळू घ्यावी तोंड बंद करावे व नाकातून हवा बाहेर सोडावी. हा प्राणायाम देखील आपल्याला साधारणता वीस वेळा किंवा एक ते दोन मिनिटे करायचा आहे. हे जे दोन्ही प्राणायाम आहेत आपण दिवसभरात पाच सहा वेळा करायचे आहेत आणि याचा तसा कुठलाही साईड इफेक्ट नाही. तुमच्या शरीरातील उष्णता येणे तात्काळ कमी होण्यास मदत होणार आहे धन्यवाद.