कोमट पाण्यात 1 चमचा घ्या,नेहमी तरुण राहाल | पोट साफ होण्यासाठी, शुगर साठी औषध बंद,वजन कमी,

नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो ज्या व्यक्तीचे पोट साफ होते त्या व्यक्तीला कुठलाही आजार होत नाही त्यासारखा श्रीमंत माणूस दुसरा कुणी नाही आणि आजचा उपाय यासाठी आयुर्वेदात रामबाण मानला गेला आहे. मित्रांनो खाल्लेले अन्न पचत नसेल गॅस होत असेल पित्त जास्त झाले असेल करपट ढेकर येत असतील छातीत कफ साचला असेल खूप औषधी घेऊनही वेळेवर पोट साफ होत नसेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

महत्त्वाचे म्हणजे या उपायाने वजन कमी होते शरीरात जास्तीचे चरबी साठली असेल तर ती पूर्णपणे कमी होते. पचनशक्ती दुप्पट वाढते भूक चांगली लागते डायबिटीस एखाद्याला असेल किंवा एखाद्या पेशंटला जर मधुमेहाचा त्रास असेल तो देखील कमी होतो. शुगर नॉर्मल राहते असे ही गुणकारी पावडर कोणत्या वस्तूचे आहे आणि याचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे.

मित्रांनो हे पावडर तुम्हाला बाजारात सहज मिळते पतंजलि स्टोअर आयुर्वेदिक दुकान किंवा ऑनलाईन देखील हे उपलब्ध आहे. अशीही गुणकारी पावडर आहे हिरडा या वनस्पतीची. होय मित्रांनो हे हिरड्याची पावडर आहे. त्याला हरितकी म्हणतात तर इंग्रजीत ब्लॅक माइरोबालान असे नाव आहे. याला संस्कृत मध्ये अमृता म्हणतात कारण याचे गुणधर्म अमृताप्रमाणे आहेत.

हे माणसाला दीर्घायुष्य देतात म्हातारपण लवकर येऊ देत नाहीत. जर एखाद्या व्यक्तीस म्हातारपण आले असेल तर ते कमी करतात डॉक्टर सुरेश नगरसेकर यांनी यांच्या एका पुस्तकांमध्ये असे सांगितले आहे की गुळ मध सुंठ पिंपळी आणि सैंधव मीठ यापैकी एक घटक व दोन ग्राम हिरडा यासोबत जर एकत्रित सेवन केला किंवा रोज घेतला तर म्हातारपण कधीच येत नाही आणि जर अचानक आले असेल तर ते नाहीसे होते.

अशा या गुणकारी हिरड्याचे पावडर आपल्याला जिथून मिळेल तिथून आपल्याला विकत घ्यायचे आहे आणि ती वापरायची आहे. जर तुमच्याकडे हिरड्याची फळ असतील तर ती फळ वापरायचे आहेत. ती फळे प्रथम भाजून घ्यायची आणि नंतर त्याचे साल काढून त्याची बारीक पावडर बनवून ती वापरायची आहेत. यासाठी प्रथम एक ग्लास पाणी घ्या ते गरम करायचे आहे.

खूप गरम करायचे नाही फक्त कोमट होऊ द्यायचे आहे म्हणजेच या उपायासाठी आपल्याला एक ग्लास कोमट पाणी वापरायचे आहे. हा उपाय आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी एक तास अगोदर करायचा आहे. बघा या एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा हिरड पावडर किंवा हिरड्याचे पावडर आपल्याला टाकायचे आहे. आता यामध्ये आपल्याला जो दुसरा पदार्थ टाकायचा आहे ते म्हणजे सेंधव मीठ यालाच सेंधा नमक असे म्हणतात.

किंवा इंग्रजीमध्ये रॉक सॉल्ट असे म्हणतात साधारणतः हे चिमूटभर घेऊन आपल्याला या मिश्रणात टाकायचे आहे आणि मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करायचे आहे आणि सेवन करायचे आहे यामुळे आपल्या पचनाच्या सर्व समस्या कमी होतील लहान मुलांसाठी याचे प्रमाण अर्धे ठेवा.