मृत्युपत्र म्हणजे काय? काय आहे त्याचे महत्व…कितीदा मिळते आणि या गोष्टी सर्वात आधी..

नमस्कार मित्रांनो, मृ त्युपत्र किंवा इच्छापत्र याची व्याख्या भारतीय वारसा का यदा 1925 मधील कलम 2 (ज) मध्ये दिलेली आहे. मृ त्युपत्र म्हणजे आपल्या संपत्ती बाबतचा आपला जो मनोदय मृ त्यूनंतर आमलात आणला जावा अशी मृ त्युपत्र करून ठेवणाऱ्याची इच्छा असते, त्याचे वैध अधिकथन असे आहे म्हणजे जर एखाद्या व्यक्तीस त्याची स्वकष्टार्जित मालमत्ता कोणास द्यायची असेल परंतु मृ त्युनंतर द्यायची असेल तर त्या व्यक्तीने मृ त्युपत्र करून ठेवणे गरजेचे आहे.

विशेषाधिकार मृ त्युपत्र – या प्रकारच्या मृ त्युपत्राचे अधिकार काही विशिष्ट व्यक्तींना दिले गेलेले आहे जसे की सै न्य दलातील व्यक्ती नौसै निक जहाजावर त्यांची कामगिरी बजावत असतात आणि त्यांच्या आसपास कोणीही व्यक्ती नसते. त्याचप्रमाणे अशी एखादी वैज्ञानिक संस्था की जी दूर पर्वतावर स्थित आहे अशा संस्थेच्या कर्मचाऱ्यांना या प्रकारचे मृ त्युपत्र करण्याचे अधिकार असतात.

थोडक्यात सांगायचे झाले तर अशा ठिकाणी कार्यरत असणारी व्यक्ती अशा परिस्थितीत असते, की ज्या व्यक्तीच्या जवळपास स माजातील लोक तर नसतात त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची सुविधा त्यांच्याजवळ नसते तर अशावेळेस अशी व्यक्ती आपले लेखी मृ त्युपत्र करू शकते, यासाठी दोन लोक आवश्यक असतात की जे साक्षीदार या नात्याने त्या मृ त्युपत्रावर सह्या करतील. आणि अशी व्यक्ती लेखी मृ त्युपत्र करण्यास असमर्थ असेल तर तोंडी मृ त्युपत्र देखील करू शकते, परंतु त्यासाठी देखील दोन साक्षीदार असणे आवश्यक आहे.

न्यायालयीन मृ त्युपत्र – जर एखाद्या व्यक्तीला फा शीची शि क्षा झाली असेल आणि ती व्यक्ती मृ त्युपत्राद्वारे त्याची संपत्ती एखाद्या व्यक्तीस देण्याची मत मांडतो अशा प्रकारचे मृ त्युपत्र नोंदते समयी त्या भागातील सब रजिस्टर आणि मॅजिस्ट्रेट यांना तेथे बोलावले जाते.

त्याच्या समक्ष स्वतःचे स्टेटमेंट तो गु न्हे गार देतो आता असे समजूया की आशा गु न्हे गारांना चलसंपत्ती देण्याचे आहे अशा वेळेस पो लीस बं दोबस्तात त्या गु न्हे गारांला त्याच्या चलसंपतीच्या जागेवर नेले जाते आणि तो गु न्हेगार त्याच्या हाताने ती चलसंपत्ती देतो.

साधारण मृ त्युपत्र – सामान्यतः या प्रकारचे मृ त्युपत्र करणेस आपले येथील व्यक्ती प्रयोरिटी देतात. कधी कधी असा प्रश्न समोर उभा राहतो की तोंडी मृ त्युपत्र केले तर चालते का? किंवा अन्य रजिस्टर मृ त्युपत्र चालते का ? का यद्यात हे स्पष्ट नमूद आहे की मृ त्युपत्र हे तोंडी किंवा लेखी दोन्ही प्रकारे चालते.

परंतु तोंडी मृ त्युपत्र सरकारी कार्यालय किंवा स रकारी विभाग हे मान्य करत नाही तर अशा वेळेस त्या मृ त्युपत्राचे को र्टातून प्रोबेट करून आणावे लागते. मृ त्युपत्रात कोणकोणत्या गोष्टी नमूद असाव्यात ? सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या संपत्तीचे मृ त्युपत्र करायचे आहे ती संपत्ती वडिलोपार्जित नसावी, स्वकष्टार्जित किंवा बक्षीस पत्राने मिळालेली असावी.

मृ त्युपत्र नेहमी रजिस्टर असावे असे कायदा सांगत नाही, परंतु पुढे अडचण येऊ नये आणि मृ त्युपत्र अनव्ये त्या व्यक्तीला संपत्ती द्यायची आहे त्याच व्यक्तीला मृ त्यूपश्चात ती संपत्ती मिळावी असे वाटत असेल तर मृ त्युपत्र रजिस्टर असावे. काही लोक पैसे वाचवण्यासाठी मृ त्युपत्र नॉटराईज करतात तर नॉटराईज मृ त्युपत्र देखील अनरजिस्टर मानले जाते आणि ते को र्टात आव्हाणीत देखील होऊ शकते.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावे मृ त्युपत्र करायचे आहे त्या व्यक्तीची मृ त्युपत्र नोंदतेवेळी तिथे उपस्थिती दर्शक कोणते प्रकारचे कृत्य असू नये. त्याच बरोबर मृ त्युपत्र करताना बेनिफिशियर एकापेक्षा जास्त असतील तर त्या मृ त्युपत्रात कोणाला किती हिस्सा द्यायचा आहे याचा स्पष्ट उल्लेख केलेला असला पाहिजे.

आणखी एक गोष्ट जर एखादी व्यक्ती मृ त्युपत्र करत असेल आणि त्याला तीन मुले आणि दोन मुली आहेत तर त्यांचा नावाचा उल्लेख मृ त्युपत्रात करावा. आणि त्यापैकी जर काही मुलांना किंवा मुलींना मृ त्युपत्राद्वारे संपत्ती द्यायचे असेल तर त्यांच्या नावाचा स्पेसिफिक उल्लेख असावा. त्याचप्रमाणे जर आशा एका व्यक्तीला जी आपली नात्यातील नाही किंवा घरातील नाही तर अशा व्यक्तीला ही मृ त्युपत्राद्वारे संपत्ती दिली जाऊ शकते. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज लाईक, कमेंट आणि शे अर करा.