मणी महेश पर्वताचे रहस्य पाहून शास्त्रज्ञ हैराण.. या पर्वतावर जो कोणी जाईल त्याच्यासोबत बघा काय घडते..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, सन 1968 मध्ये वैज्ञानिकांकडे खबर आली की भारतामध्ये कैलास शिवाय अजून एक पर्वत आहे आणि त्या पर्वतावर आजपर्यंत कोणीही चढू शकले नाही कारण जो कोणी या पर्वतावर चढण्याचा प्रयत्न करतो तो काही अंतरावर जाऊन दगड बनतो. हे ऐकताच वैज्ञानिकांनी या पर्वतावर जाण्याचे ठरविले. थोड्याच दिवसात गिर्यारोहण करणाऱ्या समूहाला तेथे पाठवण्यात आले.

गिर्यारोहण करणाऱ्या समूहाने पर्वतावर चढण्यास सुरुवात केली तर त्यांच्यासोबत असे काही घडले जे पाहून सर्वजन आश्चर्यचकित झाले. त्यानंतर बऱ्याच गिर्यारोहकांनी त्या पर्वतावर चढण्याचे प्रयत्न केले होते परंतु त्या सर्वांसोबत असे काही घडले ज्याच्यामुळे सन 2000 मध्ये त्या पर्वतावर चढण्यास स’रकारने मनाई केली. मित्रांनो तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की,

या पर्वतावर रोज पहाटे एक दिव्य प्रकाश दिसतो. हा दिव्य प्रकाश म्हणजे शेष नागाचा मणी आहे असे म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार भगवान शंकर शेषनागाला धारण करून आपल्या भक्तांना दर्शन देतात असे म्हटले जाते. ज्या क्षणी हा प्रकाश दिसतो त्या क्षणी पूर्ण आभाळ निळ्या रंगाचे होते. हिमाचल प्रदेश मधील चंबा नगर पासून 85 किलोमीटर वरती मणी महेश हा पर्वत आहे.

चंबा या ठिकाणाला शिवभूमी या नावाने ओळखले जाते. असे मानले जाते की, भगवान शंकर याच पहाडांमध्ये निवास करतात. हे एक तीर्थ आहे आणि हजारो श्रद्धाळू या तीर्थाची यात्रा करण्यासाठी येतात. या ठिकाणी मनी महेश नावाचे एक छोटे सरोवर आहे. समुद्रापासून तेरा हजार पाचशे फूट अंतरावर हे सरोवर आहे. मणी महेश पर्वताच्या शिखरा मधून एक दिव्य प्रकाश येतो.

हे पाहून असे म्हटले जाते की भगवान शंकर मणी महेश पर्वतावर विराजमान होण्यासाठी आले आहेत आणि हा दिव्य प्रकाश म्हणजे त्यांच्या गळ्यामध्ये असलेल्या शेषनागच्या मण्याचा आहे. प्रचंड थंडीमध्ये अनेक भक्तगण हे दृश्य पाहण्यासाठी तेथे येत असतात. असे सांगितले जाते की, आजमीतीपर्यंत या पर्वताची उंची कोणीही मोजू शकले नाही.

सहसा गिर्यारोहकांसाठी पर्वतावर चढणे फार कठीण नाही परंतु या पर्वतावर मर्यादित अंतराच्या पुढे जाणारे व्यक्ती कधीही परत आलेला नाही. तेथील स्थानिक लोक असे सांगतात की, गिर्यारोहण करणाऱ्या व्यक्ती अनेक पर्वतांवर चढले असतील परंतु या पर्वतावर चढणे शक्य नाही. एकेकाळी एक मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना घेऊन या पर्वतावर चढण्याचा निर्णय घेतो,

प्रत्येक पायरीवरती एका मेंढीचा बळी देऊन तो पुढे चालत असतो एका मर्यादित अंतराच्या पुढे गेल्यानंतर त्या व्यक्तीचे दगडात रूपांतर झाले शिवाय त्याच्यासोबत असलेली मेंढी सुद्धा दगड बनली. या दगडांचे अवशेष आज देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतात. या पर्वतावर जाण्याचे अनेकांचे प्रयत्न निष्फळ ठरले. त्याच प्रकारे काही लोकांना जीव सुद्धा गमवावा लागला आहे.

वैज्ञानिकांच्या मते या पर्वताच्या आजूबाजूला असलेले भौगोलिक वातावरण आणि या पर्वताची रचना या पर्वताला अजय बनवते. 1968 मध्ये भारत जपानी महिलांच्या एका संघाने या पर्वतावर जाण्याचे ठरविले काही अंतरावर जातात अचानक दरड कोसळण्यास सुरुवात झाली त्यात काही लोकांचा जीव गेला, तर काही लोक आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले.

काही काळानंतर इटलीच्या काही लोकांनी या पर्वतावर जाण्याचे ठरविले परंतु काही अंतरावर जातात ते लोक सुद्धा घाबरून परत आले. मणी महेश येथील पुजाऱ्यांनी सांगितले की सन 2000 मध्ये फ्रेंचुई येथील तीन युवकांनी या पर्वतावर जाण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्या लोकांनी आपला जीव गमावला. त्यानंतर या पर्वतावर जाण्याचा कोणी प्रयत्न केला नाही.

वैज्ञानिकांच्या आणि गिर्यारोहण करणाऱ्या लोकांच्या मते या पर्वताचे भौगोलिक वातावरण आणि या पर्वताची विशेष रचना गिर्यारोहण करण्यासाठी अनुकूल नाही. पौराणिक कथांमध्ये सांगितल्याप्रमाणे हा पर्वत भगवान शंकर यांचा आहे आणि या पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती असल्याचे पुरावे आज देखील तेथे अस्तित्वात आहेत.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा.