होळीच्या राखेपासून करा हा उपाय..सात जन्मांची गरिबी होईल नष्ट..घर पैशांनी भरून जाईल..
नमस्कार मित्रांनो
फाल्गुन पौर्णिमेला होलिकादहन केले जाते, यालाच शिमगा असेही म्हणतात. वाईट, दुष्ट गोष्टींचा नाश करण्यासाठी होळी पेटवली जातात. हिंदू संस्कृती मध्ये सर्वच तिथी विशेष असतात त्यातील एक म्हणजे होळी पौर्णिमा. होळीला गोवऱ्या रचून पेटवल्या जातात, पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो, प्रदक्षिणा घालून पवित्र अग्निदेवतेला नमस्कार केला जातो.
या रात्री माता लक्ष्मीसह अन्य देवसुद्धा आकाशमंडलात सक्रिय असतात त्यामुळे त्यांची पूजा ,आराधना करून काही उपाय करून त्यांचे आशीर्वाद लगेच मिळतात. आपल्या अडचणी, नकारात्मकता त्या होळीच्या अग्नीत राख होऊदे व आपल्या घरी सुख, धन संपत्ती नांदूदे, घरी असणारी अलक्ष्मी, अमंगळ, सं क टे, वाद दूर होउद्दे अशी प्रार्थना करा.
होळी इतकेच त्याच्या दुसऱ्या दिवशी असणारे असणाऱ्या धुळवडीच्या दिवसाला सुद्धा महत्व आहे. धुळवडची राख घरी आणून ठेवल्यास घरातील अरिष्ट टळते, घरातील नकारात्मकता दूर होते तसेच या राखेने त्यादिवशी अंघोळ केल्यास तुम्हाला कोणताही आजार होत नाही.
ही राख भस्म म्हणून श रीराला लावल्यास पवित्र असते कारण हिंदू शास्त्र असे सांगते की होळीच्या पवित्र अग्नीत देवी देवतांचा वास असतो. त्यामुळे ती राख पवित्र असते. या राखेचा उपयोग केल्याने घरातील तांत्रिक, वाईट शक्तींपासून रक्षण होते.
भूतप्रेत, करणी बाधा, नजर दोष आपल्यावरती होत नाही. हिंदू शास्त्र असे सांगते की या राखेचा उपयोग तुमच्या सुख समृध्दी साठी, तुमच्या भरभराटीसाठी, आ रोग्यासाठी व धनसंपदा प्राप्त करण्यासाठी करू शकता. घरात जर तुम्हाला आर्थिक अडचण असेल, घरात पैसा टिकत नसेल, घरात पैसा येण्याचे मार्ग बंद असतील तर हा उपाय नक्की करा.
उपाय अगदी सोपा व सरळ आहे. होलिकादहन रविवारी आले आहे तर त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही ही राख घेऊन घरी यायचं आहे, व त्याचा तिलक करून घरातील प्रत्येक सदस्याने लावायचा आहे. त्यामुळे तुमच्यावरील नजरदोष नाहीसा होईल किंवा तुम्ही जर आ जा री असाल तर पूर्णपणे बरे व्हाल.
यानंतर ही राख एक कलश घेऊन त्यात स्वच्छ पाणी भरून घ्यायचे व त्यात ही राख चांगली ढवळून मिक्स करा. आपण घरातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी जसे गोमित्र शिंपडतो तसेच हे कलशातील राख युक्त पाणी घरातील प्रत्येक कोपऱ्यात शिंपडायचे आहे, घरातील सर्व ठिकाणी पूर्ण श्रद्धेने, मनापासून हा उपाय केल्यास तुमच्या सर्व आर्थिक स म स्या दूर होतील.
घरातील वाद बंद होऊन प्रेम वाढेल, लक्ष्मीची कृपा इतकी होईल की तुम्ही धनवान व्हाल तसेच यामुळे शंभो भगवान नेहमी पाठीशी राहतील व तुमचे रक्षण करतील कारण हे राख युक्त पाणी घरातील सर्व दोष, वास्तू दोष, स्वतःतील दोष व नकारात्मक लहरी घराबाहेर घालवते. त्यामुळे हा उपाय नक्की करा व तुमचे गरिबीचे सावट दूर करून सात जन्माचे पातक नष्ट करा.
असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी आस्था फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा मराठी आस्थाचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.