कोणीच चेहरा पाहून वय सांगू शकणार नाही, वांग काळे डाग खड्डे घरगुती उपचार..

नमस्कार आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. कोणताही माणूस असो काळा व गोरा कसाही असो त्याच्या चेहऱ्यावर डाग धब्बे खड्डे पिंपल्स असतील तर तो आकर्षक दिसत नाही. जर या गोष्टी नसतील तर तो आकर्षक दिसतो आणि आजचा उपाय यासाठीच आहे. यामुळे वांगाचे डाग कमी होऊन चेहऱ्यावरील काळेपणा कमी होऊन चेहरा गोरा आणि ब्राईट होईल. हा उपाय फक्त एक स्टेप मध्ये असून हा  फेस पॅक घरच्या घरी बनवणार आहोत.

मित्रांनो कृती अगदी सोपी आहे. प्रत्येकाला घरच्या घरी करता येण्यासारखे आहे. चला तर मग कृती पाहू यात आपल्याला लागणार आहे प्रथम चंदन. मित्रांनो चंदन आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्ध होते, मिळाले नाही तर आपल्याला या चंदनाच्या लाकडाच्या ऐवजी चंदन पावडर वापरायचे आहे. तुमच्याकडे जर चंदन असेल तर ते दुधामध्ये उगळून त्याची पेस्ट बनवायची आहे आणि जर चंदन पावडर असेल तर साधारणता एक चमचा चंदन पावडर आपण या मिश्रणासाठी वापरणार आहोत.

चंदन त्वचेला शीतलता प्रदान करतं आणि त्वचेत उजळपणा आणण्यास मदत करतो. मित्रांनो जर समजा तुम्हाला चंदन पावडर मिळाले नाही म्हणजे तुम्ही रक्तचंदन किंवा लाल स्वरूपाचे चंदन असते ते वापरू शकतात. दोन्हीचे जे गुण आहेत किंवा जे उपयोग आहेत ते सारख्याच प्रमाणात असून तुम्ही एकमेकाला पर्याय म्हणून हे वापरू शकतात.

मित्रांनो हे दोन्हीही तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्ध होतात. यातील जो आपल्याला दुसरा घटक वापरायचा आहे ते म्हणजे सुंठ. मित्रांनो सुंठ प्रत्येकाच्या किचनमध्ये उपलब्ध असते आणि सुंदर काम करणार आहे. हे साधारणतः आपल्याला एक चमचा या मिश्रणामध्ये मिक्स करायचे आहे. जर तुम्ही बारीक वाटून मिक्स केली तर आपल्याला हे मिश्रण चांगलं उपयोगाला येईल. आता या मिश्रणामध्ये आपल्याला शेवटचा घटक टाकायचा आहे ते म्हणजे दूध.

मित्रांनो कच्चे दूध किंवा तापवण्या पूर्वीचे दूध साधारणतः दोन चमचे आपल्याला या मिश्रणात टाकायचे आहे ज्यांची त्वचा ऑईली आहे त्यांना हे योग्य आहे आणि ड्राय असेल तर त्यांनी दुधाच्या ऐवजी दुधाची साय वापरली तर त्याचा परिणाम खूप चांगला मिळतो. मित्रांनो हे दोन्ही घटक एकत्र मिक्स करून घ्या हे सर्व घटक एकजीव झाल्यानंतर आपल्याला हेच चेहऱ्यावर अप्लाय करायचे आहेत. हा उपाय आपल्याला साधारणतः पंधरा दिवस करायचा आहे पंधरा दिवसात आपल्याला चांगला परिणाम दिसेल.

तुम्हाला जेव्हा सकाळ दुपार संध्याकाळी ज्या वेळेला वेळ मिळेल तेव्हा हे आपल्याला फक्त पंधरा मिनिटात चेहऱ्याला लावून वाळल्यानंतर चेहरा धुऊन टाकायचा आहे. लावताना चेहऱ्याला सर्कुलर मोशन मध्ये आपण चेहऱ्यावरती हळुवार मसाज करून हे लावायचे आहे. याला कुठलाही साईड इफेक्ट नाही आणि त्यामुळे आपला चेहरा तेजस्वी कोमल ब्राईट होऊन चेहऱ्यावर वांगाचे डाग काळे डाग व चेहऱ्यावर ब्लॅकहेड वाईट हेड कमी होण्यास मदत होईल.