डोळे येऊ नयेत म्हणून करा हा छोटा घरगुती उपाय, गावात सगळ्याचे डोळे आले तरी तुमचे येणार नाहीत

नमस्कार सर्वांचे स्वागत आहे. गावामध्ये डोळे येण्याची साथ आली की माझी आजी हा उपाय आमच्या घरी नक्की करायची आणि त्यामुळे गावामधील सगळ्या मुलांच्या घरी डोळे आले तरी आमच्या घरामधील एकाही मुलाचे डोळे यायचे नाही. अत्यंत प्रभावी उपाय आहे डोळे येऊ नये म्हणून एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणूनही हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर डोळे आलेले असतील घरामध्ये कोणाचे तर त्यासाठी सुद्धा हा अत्यंत परिणामकारक असा उपाय आणि अगदी छोट्या छोट्या दोन वस्तू आपल्याला घरामध्ये जाळायचे आहे त्याचा धूर आपल्याला घरामध्ये करायचा आहे.

धूर म्हणजे अगदी धूर नाहीये तो त्याची फक्त वाफ किंवा त्याच पद्धतीचा अगदी नॉर्मल असा धूर असतो ज्याने आपल्या डोळ्याचं आरोग्य चांगलं राहतं डोळे आलेले असतील तर ते निवळतात. त्याचबरोबर घरामधील व्यक्तींचे डोळे येऊ नये म्हणून एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सुद्धा आपण तो करू शकतो. तर डोळे येण्याचे साथ सध्या जोरात चालू आहे. डोळे येणे म्हणजेच काय तर नेत्र श्लेस जो असतो त्याचा दाह होणे. त्याला सामान्य भाषेमध्ये डोळे येण असे म्हणतात.

डोळ्याचा पांढरा भाग असतो तो लाल होतो त्या ठिकाणी पिवळा असा पदार्थ बाहेर निघतो. चिकट डोळे होतात सकाळी उठल्यानंतर तर आपले डोळे एकमेकाला घट्ट चिकटलेले असतात आणि आपल्याला पाहण्यामध्ये प्रकाशामध्ये खूप त्रास होतो. अशा प्रकारचे आपल्याला लक्षणे दिसू लागतात डोळे येणं हा जिवाणू किंवा विषाणूचा संसर्गामुळे होणारा आजार आहे आणि हा खूप फास्ट नीतीने पसरतो म्हणजे हा एक संसर्गजन्य आजार आहे.

माश्या असतील चिलटे असतील याच्या मार्फत तो एकापासून दुसऱ्याला हा फास्ट रीतीने पसरतो असा हा आजार पसरू नये आपल्याकडे येऊ नये म्हणून एक प्रतिबंधात्मक उपाय आहे. जर तुम्हाला डोळे आलेले असतील तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय अत्यंत परिणामकारक आहे. कारण याने तुमच्या डोळ्यांमधील साठलेलं जे इन्फेक्शन आहे ते पूर्णपणे बाहेर निघून जातात दोन दिवसांमध्ये आणि त्यानंतर डोळे तुमचे पूर्णपणे नीवळतात.

ज्यांचे डोळे आलेले आहेत त्यांच्यासाठी एक दुसराही उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर उपाय असं करायचा आहे की उपाय करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी लागणार आहेत तर याच्यासाठी लागणारे आपल्याला कापूर. कापूर आपल्या घरामध्ये कुठलाही असेल तर तो कापूर आपल्याला घ्यायचा आहे दोन-तीन वड्या कापुराचे आपल्याला लागणार आहे. दुसरी गोष्ट आपल्याला याच्यासाठी लागणार आहे. लसूण लसणाच्या बाजूचा जो वाळलेला टरफल असतो त्याचं लसणाच्या पुढच्या बाजूला वाढलेला जो त्याचा पापुद्रा असतो तो आपल्याला लागणारे.

साधारणता चार ते पाच लसूण पाकळीचा वाळलेला पापुद्रा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि दोन-तीन कापराच्या वड्या बरोबर तो घरामध्ये जाळायचा. कापूर जर तुमच्याकडे भीमसेनी असेल तर अतिउत्तम नसेल तर कुठलाही कापूर तुम्ही घरामध्ये जाळायचा आहे. अगदी नॉर्मल डोळ्याला न दिसणारा धूर त्यांनी तयार होतो आणि प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये एक प्रकारचं संरक्षण कवच या धुराने तयार होतो.

तुम्ही करून बघा ज्यांचे डोळे आलेले आहेत ना त्यांच्या डोळ्यांमधली घाण सुद्धा दोन दिवसांमध्ये पूर्णपणे निघून जाते. एक-दोन दिवस तुम्ही हा धूर घरामध्ये नक्की करा असा हा परिणामकारक उपाय आहे. आता ज्या व्यक्तींचे डोळे आलेले आहेत किंवा लहान मुलांचे डोळे आलेल्या आहेत अशांसाठी सुद्धा एक उपाय सांगतो दोनच दिवस उपाय करायचा आहे डोळे पूर्णपणे निघून जातील. डोळ्यांचा त्रास अजिबात होणार नाही तर उपाय असं करायचं की एक गाजराचा रस आपल्याला काढायचा आणि एक कपभर पालक भाजी जी असते आपली पालक भाजी त्या भाजीचा एक कपभर पालकाचा रस काढायचा म्हणजे एक कप गाजराचा रस आणि एक कप पालक भाजीचा रस मिक्स करायचा आहे काढून घ्यायचा आहे.

मिक्स करायचा आहे आणि जेवणानंतर सकाळी घ्या किंवा संध्याकाळी घ्या. जेवणानंतर अर्ध्या तासाने तो दोन कप रस ज्या व्यक्तींचे डोळे आलेले आहेत त्यांना द्यायचा आहे. या दोन्हीही रसामध्ये विटामिन आणि विटामिन बी 2 हे दोन जीवनसत्व असतात जे तुमच्या डोळ्याचा दाह कमी करतात. आयुर्वेदामधला हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे डोळे आलेल्या व्यक्तींसाठी तर डोळे आलेल्या व्यक्तींसाठी दोन दिवस हा रस तुम्ही घ्या आणि हा प्रतिबंधआत्मक उपाय सुद्धा घरामध्ये अवश्य करा.