हे 1 पान असे वापरा, 1 मिनिटांत काळे पिवळे दात पांढरे शुभ्र होतील, तोंडातील येणे, तोंडाचा वास बंद

आपल्या सर्वांचे स्वागत आहे. दात हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा घटक असून त्याची काळजी घेणं हे खूप गरजेचं असतं. आपल्या अनेक चुकीच्या सवयीमुळे हे दात पिवळे पडतात आणि जास्त दुर्लक्ष झालं तर किडतातही. दात किडल्याचा त्रास किंवा दात किडण्याने काय त्रास होतो हे त्याच व्यक्तीला माहिती त्या व्यक्तीचे दात किडले आहेत.

दात किडण्याची सुरुवात ही दात पिवळे पडण्यापासून होते. ज्यांचे दात किडलेले असतात त्यांना जेवताना खूप त्रास होतो त्रास जास्त वाढायला लागला की दात काढावे लागतात. मात्र त्यावरील उपाय उपलब्ध आहे. आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींना हा अनुभव आला असेल की दात खूप स्वच्छ करूनही ते पिवळेच राहतात.

त्याचप्रमाणे बऱ्याच व्यक्तींना शरीरातील उष्णता किंवा अपचन झाल्यामुळे तोंडामध्ये छाले येतात. तोंडात छोटे छोटे स्पॉट येतात. खाताना त्रास होत असतो अशा सर्वांसाठी आजचा उपाय अत्यंत गुणकारी आणि महत्त्वाचा आहे. यात केवळ एक पान आपल्याला चावून चावून खायचे आहे. हे पान खाण्याचे एक पद्धत आहे. हे पान कोणत्या झाडाचे आहे ते कसे वापरायचे जर शहरात मिळाले नाही तर त्याऐवजी आपल्याला कोणता पदार्थ घरच्या घरी वापरता येईल हे सर्व आज आपण पाहणार आहोत.

मित्रांनो ही वनस्पती आहे जांभूळ. जांभळं मधुमेहावर अत्यंत गुणकारी असतात. त्याचप्रमाणे याची पाने तोंडाच्या सर्व रोगांवर गुणकारी आहेत. हा उपाय अगदी सोपा असून करणे देखील सोपा आहे. या उपायासाठी म्हणजेच एक वेळच्या उपायासाठी एक पान आपल्याला लागणार आहे. हे पान निवडताना एक काळजी घ्यायची आहे पान जास्त जुने निबर किंवा अत्यंत नवीन असणारे पान घ्यायचे नाही. तर त्याऐवजी मध्यम स्वरूपाचे किंवा कोवळे पान आपल्याला या उपायासाठी लागणार आहे.

ही पानं आपल्याला स्वच्छ मिठाच्या पाण्याने एकदा स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत आणि नंतरच वापरायचे आहेत. कारण यावरती प्रदूषण आणि माती वगैरे इतर घटक साचलेले असू शकतात मित्रांनो या पानांमध्ये नैसर्गिक पोटॅशियम असते जे दातावर नैसर्गिक चमक आणते यामुळे कुठल्याही प्रकारचा साइड इफेक्ट न होता आपले दात पांढरे होतात. त्याचप्रमाणे या पानांमध्ये जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते. जे हार्मोन्स बॅलन्स कंट्रोल करते त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींचा तोंडात नेहमी वास येतो तो वास देखील या पानाच्या चावण्याने किंवा वापराने पूर्णपणे कमी होतो.

त्याचबरोबर मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट अशी की हे पान चावून चावून याचा रस आपल्याला थुंकून द्यायचा आहे गिळायचा नाही जरी चुकून पोटात गेला तरी याला कुठलाही साईड इफेक्ट नाही. आता या उपायासाठी जो आपल्याला दुसरा घटक लागणार आहे ते म्हणजे मीठ. साधारणतः चिमूटभर मीठ फक्त चिमूटभर मीठ आपल्याला या उपायासाठी घ्यायचे आहे. हे देखील दात स्वच्छ करते त्याचप्रमाणे दातावरील मळ कमी करून दात पांढरे करण्यास मदत करते. हे फक्त चिमूटभर मीठ आपल्याला या उपायासाठी वापरायचे आहे.

ज्या व्यक्तींना ही जांभळाची पाने मिळणार नाहीत अशा व्यक्तींनी घरच्या घरी अजून एक उपाय करू शकतात. तो म्हणजे मोहरीचे तेल एक चमचा घ्या त्यामध्ये चिमूटभर मीठ टाका आणि त्या दोन्हीचे मिश्रण घेऊन आपले दात घासा. अशा या दोन्ही उपायांनी तुम्हाला पहिल्याच दिवशी 25% फरक पडलेला दिसेल म्हणजेच जांभळाच्या पानाचा असू द्या किंवा मोहरीच्या तेलाचा असू द्या जर जांभळाचा पान तुम्ही वापरत असाल तर छोट्या मुलापासून मोठ्यापर्यंत सर्वजण वापरू शकतात. दिवसात दोनदा उपाय करायचा. सलग पाच दिवस हा उपाय केल्याने तुमच्या दात जे पिवळे झाले ते पूर्णपणे पांढरे होतील. दात मजबूत होतील आणि महत्त्वाचं म्हणजे तोंडाचा वास येणार नाही.