भीम कुंडात प्रवेश करताच वैज्ञानिक पळून गेले.. आतमध्ये असे काय दिसले की पाहून सर्वांना घामच फुटला

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, भारतामध्ये असे एक मंदिर आहे ज्या मंदिराच्या खालच्या बाजूने गुफा आहेत आणि त्या गुफेमध्ये एक रहस्यमय कुंड आहे ही खबर संशोधकांपर्यंत पोहोचतात संशोधक तेथे पोहोचले. या कुंडामध्ये अशी काही रहस्य आहेत जी पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. या कुंडाच्या रहस्यांचा उलगडा वैज्ञानिक सुद्धा करू शकत नाहीत असे म्हटले जाते. वैज्ञानिकांनी या कुंडाकडे जाऊन,

आपले शोधकार्य सुरू केले काही वैज्ञानिक या गुंडाच्या 80 फूट आतमध्ये जाऊन पाहणी करत असताना त्यांना असे काही दिसले की, ते पाहून सर्व वैज्ञानिक आश्चर्यचकित झाले आणि ते वैज्ञानिक तेथून पळून आले. त्या नंतर सुद्धा ह्या कुंडाचे रहस्य जाणून घेण्यासाठी अनेक वैज्ञानिक पाहणी करून गेले परंतु कोणीही शोध लावू शकले नाही. हे कुंड नक्की कुठे आहे ते आता आपण पाहूयात.

मध्यप्रदेश मधील बुंदेलखंडात एका मंदिराच्या खाली एक गुहा आहे. ह्या गुहेमध्ये फार वर्षांपूर्वीचा एक रहस्यमयी कुंड आहे ज्या कुंडाला “भीम कुंड” असे म्हणतात. हे स्थान प्राचीन काळापासून ऋषीमुनी तपस्वी आणि साधकांचे तपश्चर्या करण्याचे स्थान राहिले आहे. वर्तमान काळात हे स्थान धार्मिक पर्यटक आणि वैज्ञानिकांच्या संशोधनाचे क्षेत्र बनले आहे.

येथे बनलेले जलकुंड वैज्ञानिकांसाठी सुद्धा एक कुतूहलाचा विषय बनले आहे. असे म्हटले जाते की, पाण्यामध्ये बुडून ज्या व्यक्तीचा मृ-त्यू होतो त्या व्यक्तीचे शव थोड्या काळाने त्याचे पाण्यावर तरंगताना दिसते परंतु या भिमकुंडामध्ये कुठल्या व्यक्तीचा मृ-त्यू झाला तर त्याची शेव कधीही वर येत नाही. ह्या भिमकुंडाच्या बाहेर जाण्याच्या मार्गावर पायऱ्या आहेत आणि,

त्या पायऱ्यांच्या बाजूला चतुर्भुज विष्णूची आणि महालक्ष्मीची मूर्ती असलेले मंदिर आहे. भीम कुंड एक असे स्थळ आहे की, जे मनुष्याला मृ’त्यूलोक आणि परलोक याचा आनंद मिळवून देते. ह्या कुंडाचा इतिहास पाच हजार वर्षापूर्वीचा आहे. महाभारतातील पांडवांना ज्यावेळी अज्ञात वास मिळाला होता त्यावेळी हे पांडव अरण्य मधून त्या दिशेने निघाले होते.

द्रौपदीला तहान लागली होती परंतु पाण्याचा स्त्रोत कुठेही दिसत नव्हता. द्रोपदीला तहानेने व्याकुळ झालेले पाहून भीमचा क्रोध अनावर झाला आणि आपल्या गधेने प्रहार करून त्या ठिकाणी एक पाण्याचा स्त्रोत निर्माण केला. या ठिकाणी जे कुंड निर्माण झाले त्या पाण्याने द्रौपदी आणि पांडव यांनी आपली तहान भागवली. म्हणून ह्या कुंडाचे नाव भीमकुंड असे ठेवण्यात आले असे मानले जाते.

आता आपण पाहू की, ह्या कुंडामध्ये अशी काय रहस्य आहेत जी आजपर्यंत वैज्ञानिक सुद्धा उलगडू शकले नाहीत. हे कुंड त्यावेळी चर्चेत आले ज्यावेळी सुनामी झाली होती. सुनामी च्या दरम्याने या कुंडाच्या पाण्यामध्ये हालचाल सुरू झाली होती. हे असे का होत आहे हे जाणून घेण्यासाठी वैज्ञानिक तेथे पोहोचले आणि सर्वप्रथम हे जाणण्याचा प्रयत्न केला की, ही कुंड किती खोल आहे.

वैज्ञानिकांनी या कुंडाची खोली मोजण्यासाठी अनेक फुटाचे दोरखंड पाण्यामध्ये सोडले परंतु ह्या कुंडाची नक्की खोली किती आहे हे कळू शकले नाही. त्यानंतर वैज्ञानिकांनी काही शोधकर्त्याना पाण्याखाली जाऊन पहायला सांगितले त्यावेळी शोधकर्ते एंशी फूट खाली गेले असता त्यांना असे काही दिसले की, ते शोधकर्ते आश्चर्यचकित होऊन बाहेर आले.

बाहेर येऊन त्यांनी सांगितले की 80 फूट खोल गेल्यानंतर ह्या कुंडामध्ये अजून दोन पाण्याच्या विहिरी आहेत ज्यामध्ये एका विहिरीतून पाणी आत येते आणि दुसऱ्या विहिरीतून पाणी बाहेर जाते ह्या सगळ्याची गती एवढी वेगाने असते की, याचा अंदाजही लावता येत नाही. या कुंडाचे पाणी नेहमी स्वच्छ असते हे पाणी एवढे स्वच्छ असते की,

ह्या कुंडाचा तळ अगदी स्पष्टपणे दिसतो. सूर्याची किरणे ज्यावेळी या पाण्यावर पडतात त्यावेळी हे दृश्य मनमो’हक दिसते शिवाय इथे इंद्रधनुष्य देखील तयार होतात. त्या गावाच्या आजूबाजूच्या क्षेत्रात हे पाणी पुरविले जाते. ह्या पाण्याचा स्त्रोत कधीही कमी होत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा ह्या कुंडा मध्ये पाण्याचा स्त्रोत कायम असतो.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा.