पावनखिंड चित्रपटाने तीन दिवसात कमवले तब्बल इतके कोटी…बघा सगळा विक्रम मोडला..१९१० शो ​मिळालेला पहिला चित्रपट

सह्याद्रीच्या कातळात असलेल्या घोडखिंडीची पावनखिंड कशी झाली, हा प्रवास चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज (चिन्मय मांडलेकर) यांच्या तोंडून ऐकायला आणि पाहायला मिळतो. चित्रपटाची सुरुवात होते, ती राज्याभिषेकापूर्वी महाराज आपल्या काही मावळ्यांसह शंभूराजांना कासारी नदीकाठी घेऊन येतात. नदीच्या पाण्याला वंदन करतात. याचं कारण, याच पाण्यात बांदल सेनेनं आपलं र’क्त सांडलं होतं.

स्वराज्य उभं करण्यामागे ज्या शूरवीरांची मोलाची साथ लाभली, त्यांच्याविषयी महाराज शंभूराजांना सांगू लागतात आणि चित्रपटाचं कथानक महाराजांच्या स्मृतीतून प्रेक्षकांसमोर उभं राहतं. पावनखिंड म्हणल्यावर सर्वसामान्यपणे बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाविषयी इतिहासाच्या पुस्तकात वाचलेल्या काही ओळी आठवतात, पण केवळ काही ओळींमध्ये संपेल इतकी छोटी ही घटना नक्कीच नाही. म्हणूनच हा चित्रपट बघणं आणि समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

बाजीप्रभू देशपांडे यांच्या खांद्याला खांदा लावून लाभलेल्या वीरांची ओळख आपल्याला चित्रपटात होते. रायाजीराव बांदल (अंकित मोहन), कोयाजीराव बांदल (अक्षय वाघमारे), बहिर्जी नाईक (हरिश दुधाडे), सरनोबत नेताजी पालकर (विक्रम गायकवाड), श्रीमंत शंभूसिंह जाधवराव (बिपीन सुर्वे), फुलाजीप्रभू देशपांडे (सुनील जाधव), हरप्या (शिवराज वायचळ), गंगाधरपंत (वैभव मांगले) आणि महाराजांसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा नरवीर शिवा काशीद (अजिंक्य ननावरे) या चेहऱ्यांचं, त्यांच्या कामगिरीचं आणि शौर्याचं दर्शन या सिनेमात होतं.

यात लेखक म्हणून दिग्पालचंही श्रेय आहे, कारण त्यानं प्रत्येक भूमिका बारकाईने लिहिली आहे.  १​९०० हुन अधिक शो ​​मिळालेला पहिला मराठी चित्रपट म्हणून पावनखिंड या चित्रपटाने नाव नोंदवले आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चोख बजावली आहे. मृणाल कुलकर्णी यांनी साकारलेल्या जिजाऊ तितक्याच ताकदीच्या उभ्या केलेल्या पाहायला मिळाल्या.

उत्कृष्ट दिग्दर्शन आणि कलाकारांनी साकारलेला दमदार अभिनय यामुळे पावनखिंड चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. पावनखिंड या चित्रपटाला देखील प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. नियमामुळे अगदी ५० टक्के क्षमतेनेच चित्रपटगृह भरत असली तरी पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १.१५ कोटींचा गल्ला या चित्रपटाने मिळवला आहे. शनिवारी शिवजयंती निमित्त प्रेक्षकांनी चित्रपटगृहा बाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लावत तब्बल २.०८ कोटींचा गल्ला जमवून दिला आहे. काल रविवारी २.८० कोटी इतकी कमाई केलेली आहे.

त्यामुळे अवघ्या तीन दिवसातच पावनखिंड चित्रपटाने ६.०३ करोडोंचा गल्ला आपल्या खात्यात जमा केला आहे​​. तर आज सोमवारी हा चित्रपट जवळपास दीड कोटींचा पल्ला गाठणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. चित्रपट बनवण्यासाठी जवळपास ८ कोटींचा खर्च लागला असल्याचे सांगितले जाते. यात चित्रपटाचे प्रमोशन आणि पोस्टर्सचा खर्च समाविष्ट करण्यात आला आहे.

तीन दिवसात ६ कोटींचा गल्ला जमवणारा पावनखिंड चित्रपट पुढील दिवसांचे बुकिंग झाल्यामुळे हाऊसफुल्लचे बोर्ड लावताना दिसत आहे. सध्या मराठी चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचून आणण्यास समर्थ ठरले आहेत. जयंती, पांडू, झिम्मा अशा चित्रपटांनी देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली पाहायला मिळाली. त्यामुळे मराठी चित्रपट आता हिंदी चित्रपटांना तगडी टक्कर देताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *