सिरीयल बंद होण्यामागचे सत्य समोर आलंय..या कारणामुळे जय भवानी जय शिवाजी सिरीयल बंद झाली..बघा कोणामुळे
अखंड महाराष्ट्राचे दैवत छ्त्रपती शिवराय, महाराजांची पुस्तके वाचायला, त्यांची भूमिका असणाऱ्या मालिका बघायला आपल्या सर्वांनाच आवडते, त्यामुळे लहानपणापासून थोरा पर्यंत सर्वचजण इतिहास पाहतात, वाचतात सुद्धा. अशीच एक मालिका महाराजांच्या जीवनातील धगधनगणारा इतिहास दाखवणारि म्हणजेच स्टार प्रवाह वरील जय भवानी जय शिवाजी ही मालिका.
सर्वचजण अतिशय कुतूहलाने पाहत होते पण ही मालिका अचानक बंद झाली, मिळालेल्या माहितीनुसार या मालिकेतील पुढील भूमिका म्हणजेच शाहिस्तेखान हे पात्र साकारण्यासाठी एका अभिनेत्याची निवड देखील झाली होती मग तरीसुद्धा अचानक ही सिरीयल बंद का झाली.
पण याला जबाबदार कोण हे नक्की कमेंट मध्ये सांगा, आपल्या सर्वांना माहीतच आहे की जय भवानी जय शिवाजी या मालिकेचा शेवटचा भाग मागच्या रविवारी आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि यानंतर ही सिरीयल बंद झाली आहे. सिरीयल बंद झाल्यामुळे बऱ्याच लोकांना फरक पडतोय, इतक्या लोकांना वाईट वाटले हे पाहून समाधान वाटलं आणि बऱ्याच लोकांनी स्टार प्रवाह चैनल वर आपला राग व्यक्त केला,
काहीजण म्हणाले स्टार प्रवाहला नको त्या सासवा सुनाच्या सिरीयल दाखवायचे आहे आणि ही चांगली सिरीयल बंद करायची आहे? कोणी म्हटलं खुपजण आता जर स्टार प्रवाह पाहणारच नाहीत जोपर्यंत मालिका पुन्हा सुरू होत नाही तर कोणी म्हणालं स्टार प्रवाहने टाइमिंग उशिरा ठेवल्यामुळे या मालिकेला प्रसिद्धी पाहिजे तितकी मिळाली नाही आणि त्यामुळे मालिका बंद झाली.
पण विचार केला तर चूक फक्त स्टार प्रवाहची आहे का. हा देखील प्रश्न पडतो, स्टार प्रवाहने टाइमिंग जे उशिरा ठेवल ते थोड लवकर ठेवायला हव होत पण रात्री १०.३० टाइमिंगला असणाऱ्या कितीतरी सिरीयल याआधी हि’ट झाले आहेत आणि या हि’ट केल्या कोणी याच उत्तर कोण तर आपणच ना? मग तिथेही सिरीयल बंद होण्यामध्ये किंबहुना होण्यासाठी सिंहाचा वाटा कोणी उचलला.
सिरीयल बंद होण्यामागे माझ्या तुमच्यासारखीच लोक कारणीभूत कुठेतरी आहेतच, जबाबदार आहेत. कोणी कोणत्या सिरीयल पहाव्यात काही हा ज्याचा त्याचा प्रश्न, परंतु भावी पिढीसमोर आदर्श उभा करण्यासाठी ऐतिहासिक मालिका जपणे सर्वांची जबाबदारी आहे. पण सद्यस्थितीत लोकांना सासू-सुनांच्या मालिका बघण्याची आवड आहे तितका रस किंवा आवड शिवाजी राजांची सिरीयल पाहण्यात, आपला इतिहास पाहण्यात नसावा ही सर्वात खेदजनक गोष्ट आहे.
महाराष्ट्रात टीआरपी आणि प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद कमी पडून छत्रपती शिवाजी राजांची सिरीयल बंद करायची या टीम वरती वेळ आली आहे यापेक्षा वाईट काय असूच शकतं नाही. त्यामुळे मालिकेला किंवा या सिरीयलचा प्रोडक्शनला दोष देऊन किंवा चैनलला दोष देऊन काय उपयोगाचं नाही, इतिहासाची जागरूकता सर्वांच्यात असावी.
अगदी साधे गणित आहे जर कोणी सिरीयल आवडीने पाहिली असती तर या मालिकेला प्रतिसाद भेटला असता तर ही सिरीयल बंद झालीच नसती. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोणतीही ऐतिहासिक सिरीयल बनवण्यासाठी खर्च हा जास्त लागतो कारण सेट मोठा असतो जास्त कलाकार या सिरीयल मध्ये असतात मग खर्चही जास्त होतो.
पण मग अथक प्रयत्न करून सुद्धा जर प्रतिसाद नाही भेटला तर सिरीयल बंद होतात. अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, मालिका पुन्हा सुरू होऊन आपल्यापुढे महाराजांचा जिवंत इतिहास पुन्हा दिसावा व ती मालवू नये असे तुम्हाला देखील वाटते का ? तुम्ही सुद्धा मालिका पाहत होता का? कमेंट करून नक्की आपल्या भावना कळवा.