म्हणून शेवंताने मालिका सोडली..? रात्रीस खेळ चाले च्या सेटवर तिच्यासोबत घडल्या होत्या अशा घटना..सांगितले सर्व काही..

संपूर्ण मनोरंजन विश्व आपल्या नेहमीच स्वागताला हजर असते मग ते मालिका, सिनेमा, नाटक, वेबसिरीज, शॉ’र्ट फिल्म्स आणि कित्येक माध्यमांनी आपलं मनोरंजन विश्व नटलेलं आहे. बरेच जण वेगवेगळ्या कारणांनी या विश्वाशी कळत नकळत जोडले जातात व भावुक होतात, काहीजण प्रत्यक्षात तसे काही करतात हे अजब, इतकेच नव्हे तर मालिकेशी चाहत्यांची वीण घ’ट्ट बनलेली असते. एखादी खास व्यक्तिरेखा त्यांच्या मनावर राज्य करते.

या प्रत्येक माध्यमातून आलेल्या विविध कलाकृती आपलं सातत्याने मनोरंजन करत असतात. पण त्यातही काही कलाकृती आपल्या मनात खास असं स्थान मिळवून जातात. किंबहुना हे स्थान इतकं खास असतं की त्यातील बदल हे नेहमीच आपल्या चर्चांचा विषय बनत असतात. त्यातले काही बदल हे अपेक्षित असतात तर काही अनपेक्षित असतात. यातील अनपेक्षित बदलांनी त्या कलाकृतींच्या चाहत्यांना ध क्का हा जरा जास्तच बसतो.

त्यातही हे बदल जर मध्यवर्ती व्यक्तिरेखेविषयी असतील तर मग हे बदल पचवणं थोडं कठीण ही असतं. हे बदल व त्यावर सोसिएल मीडिया वरती निषेध देखील केला जातो, कारण एखाद्या कलाकाराला त्या त्या व्यक्तिरेखेत बघण्याची सवय झालेली असते. मग मनाची अवस्था अशी बनते की ही व्यक्तिरेखा अमुकच व्यक्तीने शेवटपर्यंत साकारावी.

मनोरंजन फुल धमाल व कोकण वस्ती, तेथील माणसे, त्यांची जीवनशैली यांनी परिपूर्ण नटलेली मालिका रात्रीस खेळ चाले ३ परत एकवेळ आपल्या भेटीला आली आहे, या मालिकेतील शेवंताची भूमिका रंगवणाऱ्या अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने मालिका सोडली असल्याने मालिकेच्या प्रेक्षकांना ध-क्का बसला आहे. रात्रीस खेळ चाले २ शेवंतामुळे सुपरहि-ट झालेल्या मालिकेच्या तिसऱ्या सिजनमध्ये देखील अपूर्वा शेवंताची भूमिका निभावताना दिसली.

मात्र एका कारणामुळे तिने ही मालिका अचानकपणे सोडली असल्याचे सांगितले आहे. अपूर्वाने आधी कित्येक दिवस याबाबत मौन ठेवले पण अखेरीस तिने खुलासा केला, सांगितलं की, शेवंताच्या भूमिकेसाठी मी १० किलो वजन वाढवलं होतं वजन वाढवल्यानंतर ज्या काही निगेटिव्ह कमेंट्स आल्या त्या मी फेस करत आले.

पण ती गोष्ट तात्पुरती होती पण होती तर महत्वाची, प्रत्येक कलाकार त्याची भूमिका ठ’ळक व आकर्षण दिसण्यासाठी नक्कीच वेगवेगळे प्रयत्न करत असतो तसाच प्रयत्न मी देखील केला तेही दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून. परंतु आता सेटवर काम करत असताना अगदीच नवख्या आणि काही जेष्ठ कलाकारांनी विनाकारण या वाढलेल्या वजनावर माझे वि’डं’बन केले, उघडपणे माझी खिल्ली उडवली गेली.

त्यात काही कमेंट्स तर मला जि’व्हा’री लागतील अशा जाणीवपूर्वक वारंवार केल्या गेल्या. त्याबद्दल वरिष्ठांनी कारवाई केल्यानंतरही सं-बंधित कलाकारांनी साधी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही. तुम्हाला माहीतच आहे की रात्रीस खेळ चाले शू-टिंग सावंतवाडीत चालू आहे. मी मुंबईहून १२ तासांचा ट्रेन प्रवास करून जात होते, मला शू-टिंगकरता बोलावल्यानंतर फक्त एकच दिवस शू-ट करून नंतर ३-४ दिवस काहीच शूट केलं जातं नव्हतं,

अस महिन्याभरात केवळ ६ ते ७ दिवसच काम लागत होतं आणि त्याकरता मला वारंवार प्रवास करावा लागत होता. त्यात माझा अमूल्य वेळ संपूर्ण महिनाभर वाया जात होता. प्रोडक्शन हाऊस कडून मला सांगण्यात आलं की तिसऱ्या सिजनसाठी तुमचे ५ ते६ दिवस लागणार आहेत तेव्हा मी नकार दिला पण अजून एक मालिका देतो अस आश्वासन दिलं गेलं.

परंतु ५ ते ६ महिने झाले तरी अद्याप हे आश्वासन पाळलं नाही त्यामुळे माझं आर्थिक नुकसान झालं. असाच प्रकार तुझं माझं जमतंय या मालिकेवेळी सुद्धा घडला त्या मालिकेचा अद्याप शेवटचा चेक मला मिळाला नाही. मी अत्यंत प्रामाणिकपणे एकनिष्ठ राहून माझं काम केलं, माझी भूमिका साकारली परंतु माझ्या कष्टाचा मोबदला मिळत नसेल, नवख्या काळकरांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर या ठिकाणी काम करणं माझ्या तत्वात बसत नाही.

अस माझं परखड मत आहे. त्यामुळे मी ही मालिका सोडत आहे असे अपूर्वा म्हणते. शेवंताच्या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली त्यामुळे ही भूमिका सोडताना खूपच वाईट वाटतंय असंही ती म्हणाली. प्रेक्षकांचे प्रेम माझ्यावर असेच राहो अशी आशा तिने व्यक्त केली आहे. दरम्यान अपूर्वाने मालिका सोडली असल्याने शेवंताची भूमिका आता अभिनेत्री कृतिका तुळसकर निभावणार आहे.

कृतिका तुळसकर हिने बबन, विजेता, पाशबंध या चित्रपटातून काम केलं आहे. मालिकेत अपूर्वाने साकारलेली शेवंता प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली आहे त्यामुळे दुसऱ्या अभिनेत्रीला ह्या भूमिकेत आपण पाहू शकता का, तुमच्या देखील एक चाहता म्हणून भावना दुखावल्या गेल्यात का ? याबद्दल नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *